शेंगदाण्याची चटणी आणि पापडाचा खुडा/खुळा

(Link to English recipe)
पूर्वी घरांमध्ये एक खूप छान पद्धत होती. सकाळी नाश्त्याला साधेसे काहीतरी जसे उरल्या भाताचा फोडणीचा भात, उरलेल्या पोळ्यांचा केलेला मनोहरा, क्वचित कधीतरी पोहे-उप्पीट. सकाळच्या जेवणाला मात्र सगळे साग्रसंगीत पोळी/भाकरी भाजी, वरण/आमटी, भात असली तर एखादी चटणी किंवा कोशिंबीर. रात्रीचे जेवण साधेसुधे - पिठले भात किंवा कधीतरी  मुगाच्या डाळीची खिचडी, सकाळचे उरलेले जे काही असेल ते. क्वचित कधीतरी हुक्की आली तर वरणफळं. सकाळ संध्याकाळ ताजा भरभक्कम, चारीठाव स्वयंपाक फार कमी घरी होत असे. यामागची कारणे अनेक होती त्यातले मुख्य कारण म्हणजे रात्रीच्या दिव्यात स्वयंपाक करणे अवघड जात असे. अजून एक दुसरे अतिशय महत्वाचे कारण म्हणजे घरातल्या बायका सकाळपासून कामाला जुंपलेल्या असत त्यांना रात्रीच्या स्वयंपाकातून थोडी विश्रांती.
मम्मीकडे संध्याकाळी फक्त ताज्या भाकरी होतात बाकी सगळे सकाळचे. सासरी संध्याकाळी फक्त मुगाची खिचडी जेवायला असते. कुणाला फारच भूक असेल तर सकाळची पोळी-भाजी वाढली जाते. शेंगदाण्याची कोरडी चटणी आणि पापडाचा खुडा मुगाच्या खिचडीबरोबर खाल्ले जाते. आज लिहिणार आहे तीच शेंगदाण्याची चटणी वापरून हा खुडा करतात. पापड वगैरे आपण खातो त्याचे पापडाचा खुडा / खुळा हे एक थोडे सजवलेले रूप आहे.

IMG_0407


शेंगदाण्याची चटणी अशी करतात -

१ वाटी ताजे भाजलेले दाणे
८-१० पाकळ्या लसूण
८-१० लाल सुक्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी जास्त कराव्यात)
चवीप्रमाणे मीठ

कृती - 
दाणे शक्यतो ताजे भाजलेले कोमट असावेत. किंवा ऐनवेळी थोडेसे गरम करुन घ्यावेत.
लाल मिरच्यांचे  देठ काढून गरम तव्यावर किंचीत भाजून घ्याव्यात.
भाजलेल्या मिरच्या, लसूण आणि मीठ मिक्सरमधुन  भरड करावे. त्यातील निम्मे मिश्रण बाजुला काढावे आणि मिक्सरमधे  भाजलेल्या दाण्यापैकी अर्धे दाणे घालावेत. चटणीप्रमाणे  जाडेभरडे  बारीक करावे. ते बाजुला काढुन उरलेले वाटण आणि उरलेल्या दाण्याची पण अशीच चटणी करावी. दोन्ही नीट एकत्र करुन, मीठ लागणार असेल तर घालावे.


Papadacha Khuda

आता बनवूयात खुडा -
४-५ पापड
२-३ टेबलस्पून वरच्या रेसिपीने बनवलेली  शेंगदाण्याची चटणी
२-३ टीस्पून तेल

कृती -
पापड भाजून घ्यावेत. मी मायक्रोवेव्हमध्ये भाजते. तळलेले पापड शक्यतो नकोत.
ते चुरुन बारिक करून घ्यावेत. साधारण  हरबर्‍याच्या  डाळीइतके मोठे तुकडे होतील असा चुरा झाला पाहीजे.
त्यात तेल आणि चटणी घालून नीट मिसळून घ्या.
झाला खुडा/खुळा तयार!!
गरम गरम खिचडी त्यावर कच्चे तेल, शेंगदाण्याची चटणी आणि सोबतीला खुडा. मस्त जेवण झालंच म्हणून समजा.

टिप्स -
  1. चटणी करताना दाण्याची साले श्यक्यतो काढू नये.
  2. चटणीची मिरची-मीठ-लसूण वाटताना अजिबात पाणी वापरू नये. ही चटणी कोरडी असते.
  3. मिरची भाजताना एग्झॉस्ट फॅन चालू करुन घराच्या खिडक्या दारे उघडून हा कारभार करावा ;)  
  4. यासाठी पारंपारीक पद्धतीने केलेले ज्वारीचे बिबडे/बिबळे वापरतात. पण उडदाचे पापड, तांदळाचे खिच्चे या कशाचेही हे छान लागते. 
  5. पापडाचे उरलेले तुकडे, चुरा वगैरे भाजूनही हा प्रकार केला जातो. 
  6. खानदेशी भाषेत ड आणि ळ याच्या मधला एक उच्चार असतो तो या खुड्याच्या उच्चारात आहे. 
Bookmark and Share

Comments

  1. :) Kaalach mi hi chutney keli hoti... pan jast kordi zaali nahi.. bahutek shengdanyachya pramant lasun jast zaala :)

    ~Mrinal

    ReplyDelete
  2. Asa ha khuda asala tar khichadi-chi garaj-ach nahi.

    ReplyDelete
  3. Mrinal: You like your chutney dry? We should exchange our grinders then! I prefer my chutney crumbly and soft rather than powdery (like aai makes it in a mortar-pestle) but that's very hard to achieve in my grinder.

    Mints: I never heard of 'khuda' before, but this chutney would be made in our house all teh time when I was growing up. And when we had papad also, my sister and I would crumble our papads into the chutney and mix it up with oil and my mother thought we were weirdos :D I need to tell her we were just more rustic cuisine-savy :D

    ReplyDelete
  4. पाककृती नुसती वाचून आणि चित्रं पाहूनच तोंड खवळलं बघ! :-)

    ReplyDelete
  5. My god, Mints, my mouth is watering! I can't get over that beautiful red color.
    Your writeup takes me back to those uncomplicated times when women spent so much time and effort creating great food. Now, even those of us who love to cook have to go about it in a "30-minute" fashion, given our busy lives. One can't help but feel something's lost...

    ReplyDelete
  6. आज भात आणि खुडा असा बेत केलाय. शेंगदाण्याची चटणी होतीच घरात. थोडी कोथिंबीर पण घातली त्यात. फार भारी लागत हे काँबो.Thanks.

    Seema

    ReplyDelete
  7. Mrinal - I like my chutney bit on the oily side than dry.

    TC - You bet! I can eat this khuda anytime of the day.

    Priya, you are still a cuisine savy girl :)

    Abhijit -Thank you.

    Vaishali, I totally agree with you about 'feeling of something is lost ...' I feel it that way often these days ...

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.