बीट कोशिंबीर (Beet Koshimbir)

मी अगदी नवीन नवीन स्वयंपाक शिकले होते तेव्हा कोणतीतरी कोशिंबीर कर असे मम्मी सांगायची. त्या सर्वात बीटची कोशिंबीर माझी आवडीची कारण त्याचा सुंदर रंग. मी स्वत: भाजी आणायला गेले की हमखास बीट आणायचेच. त्यावेळी माझे कोल्हापुरला खूप जाणे होत असे. एकदा मामींबरोबर भाजी आणायला गेले तेव्हा उत्साहाने बीट घेउयाकी की म्हणुन घेउन आले. मामीना कौतुकाने कोशिंबीर करुन दाखवली. थोड्यावेळात माझा काका जेवायला बसला. आणि पहिल्याच घासाला लिंबाचे बी, आणि मिरचीचा तुकडा असला तुफान संगम त्याच्या तोंडात झाला! तेव्हापासून बीटची कोशिंबीर केली की मला त्याचा तो विचित्र चेहेराच आठवतो.

अलीकडे माझे खुपच exotic पदार्थ खाउन/ लिहुन झाले तेव्हा एखादा साधा -सुधा घरगुती पदार्थ करुन लिहावा वाटला तेव्हा मला अपसूकच बीटच्या कोशिंबीरीची आठवण झाली.

Beet Koshimbir

२ मध्यम आकाराचे बीट
२ टेबलस्पून दाण्याचे कूट
१/२ लिंबाचा रस
चवीपुरते मीठ, साखर
मुठभर कोथिंबीर

फोडणीसाठी - १ टीस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग, १ हिरवी मिरची चिरुन

कृती - बीट स्वच्छ धुवुन कुकरला एक शिट्टी करून शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर साल काढुन मोठ्या खिसणीने खिसुन घ्यावे. त्यात दाण्याचे कूट, साखर, मीठ, लिंबाचा रस घालावा. फोडणीच्या वाटीमधे तेल गरम करुन जिरे, मोहरी, हिंग घालुन ते तडतडले की त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालून गॅस बंद करून २-३ मिनीटे तसाच राहु द्यावा. त्यामुळे मिरची कुरकुरीत होईल. त्यानंतर ती फोडणी खिसलेल्या बीटमधे घालून सगळे नीट मिसळावे. वरून कोथिंबीर घालावी.

टीप - १. बीट शिजवताना खूपवेळ शिजवू नये. थोडे कडक राहीले तरी चालतात.
२. लहान मुलांसाठी ही कोशिंबीर करताना त्यात मिरची घातली नाही तरी चालते.

Comments

  1. वा! माझी पण आवडती कोशिंबीर आहे ही. एकीकडे पोळ्या चालू असताना बीट अर्धा/चतकोर कापून मायक्रोवेव्हमध्ये शिजवते मी युजुअली :) आणि एक variation म्हणजे लिंबाऐवजी दही घालते कधी कधी... पाणी फार सुटतं, पण नेहमीपेक्षा वेगळी चव म्हणून बदल बरा वाटतो.

    ReplyDelete
  2. Thanks for posting this! There are so many variations and I was pleased to find something by a Maharashtrian. In my opinion, our preparations are among some of the healthiest ways of preparing vegetables. Plus, I'm trying to get more antioxidants into the diet here at home and beets are an excellent source. It was too late to call my mom (who lives on the East Coast), so I typed in beet koshimbir - something my mom used to make often - and here you are!

    ReplyDelete
  3. Thank yo Manisha and welcome to my blog. And I agree with you about marathi food being healthy.

    ReplyDelete
  4. I made this today for the first time.. It tastes fantastic! Thank you for a great recipe.

    ReplyDelete
  5. Beet shijvun ghene compulsory ahe ka?

    ReplyDelete
    Replies
    1. Kadhi kacche beet khalle tar tras hou shakato mhanun shijavate me.

      Delete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.