सकाळची भाजी कमी पडणार असेल किंवा पप्पांपुरती असेल तर मग मम्मी आमच्यासाठी ही भाजी करायची. पप्पांना टोमॅटोच्या भाजीत अज्जिबात इंटरेस्ट नसायचा त्यामुळे तेही खूश आणि मला आणि सुबोधला खुप आवडायची म्हणुन आम्ही खूश! पण एक मात्र खरे, ही भाजी मुद्दाम ठरवून केली की अजिबात ती चव येत नाही. पट्कन काहीतरी हवे म्हणुन २ टोमॅटो चिरावेत एखादा पाकळी लसुण ठेचावा आणि करावी तिच चव खरी!Tomato Bhaji
२ मोठे पिकलेले टोमॅटो
१-२ लसूण पाकळ्या चिरुन
१/२ कांदा (वगळला तरी हरकत नाही)
१ चमचा दाण्याचे कुट
फोडणीसाठी थोडे तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद
१/२ टीस्पून गोडा मसाला
चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, साखर
कृती - कांदा, टोमॅटो चिरुन घ्यावा. लसुण ठेचुन घ्यावा. एका कढईत तेलाची जिरे, मोहरी, हिंग, हळद घालुन फोडणी घालावी. त्यातच ठेचलेला लसुण घालुन थोडे परतावे. कांदा घालणार असाल तर तो परतुन घ्यावा. वरुन चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, मीठ, साखर आणि गोडा मसाला घालावा. नीट परतावे. टोमॅटो शिजायला खुप वेळ लागत नाही. साधारण ३-४ मिनीटे परतून दाण्याचे कूट घालावे. मिसळून गॅस बंद करावा.
टीप - १. टोमॅटो नीट पिकलेले असतील तर ही भाजी एकदम चविष्ट लागते.
२. मसाले वगैरे न घालता पण ही भाजी मस्त लागते.
३. भाजी थोडी पातळ चालणार असेल तर गॅस बारीक करुन शिजवावी आणि थोडी दाट हवी असेल तर गॅस मोठा करून शिजवावी.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||
Wednesday, March 26, 2008
लाल टोमॅटोची भाजी (Red Tomato Curry)
Subscribe to:
Post Comments (Atom)





3 comments:
Yummy! आमच्या घरी पण ही भाजी quick-fix म्हणून आवडती होती. आई साखरेऐवजी गूळ घालत असे. खूप दिवसात खाल्ली नाही. केलीच पाहिजे आता!
BTW, हे भांडं 'घरी पाडलेलं' आहे का? :)
majhyaa blog madhale 80% bhandi ghari padaleli asatat :)
Post a Comment
Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.