Quinoa (किनवा) हे एक धान्य हाय प्रोटीन धान्य आहे. न्युट्रिशनिस्टच्या मते ह्या धान्याचा उपयोग रोजच्या जेवणात असावा. सध्या ह्याचे वेगवेगळे प्रयोग चालु आहेत.
हे धान्य असे दिसते -Quinoa
मी केलेला पुलाव असा दिसत होता -किनवा पुलाव
१ कप किनवा
२ कप पाणी
३-४ हिरव्या मिरच्या चिरुन
१ चमचा तेल
फोडणीचे साहित्य
चवीपुरते मीठ
१/२ चमचा गरम मसाला
कृती - किनवा पाण्यात धुवु्न घ्यावा. तेलाची फोडणी करुन मिरच्या घालाव्यात. त्यात किनवा घालुन २ ते ३ मिनिटे परतुन घ्यावे. त्यात पाणी, मीठ, गरम मसाला घालावा. साधारण ५ मिनिटे ते मोठ्या आचेवर उकळावे. त्यावर गॅस बारीक करुन झाकण लावावे आणि पूर्ण शिजु द्यावे. वरुन कोथिंबीर घालावी.
टीप -
१. हे धान्य साधारण ज्वारीसारखे दिसते दाणा बारीक असतो.
२. शिजलेल्या किनवा साधारण शिजलेल्या गव्हाच्या रव्यासारखा दिसतो.
३. किनवा भिजवुन साधारण ५-६ तास ठेवला तर त्याला मोड येतात.
४. ह्या धान्याचे भारतीय नाव काय आहे ते माहीती नाही.
(फोटो सौजन्य - http://www.all-creatures.org/)
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||
Saturday, October 13, 2007
किनवा पुलाव (Quinoa Pulav)
Subscribe to:
Post Comments (Atom)





3 comments:
Do you get Quinoa in India ?
I searched on the web about that and did not find mush information about it.
Thanks for introducing me to this wonderfully nutritious grain. I eat it now as an alternative to rice. Cooks effortlessly, has a nuetral taste and is so healthy!
मी कधीतरी मिरच्यांसोबत थोड्या भाज्या (मटार, बीन्स, गाजर, फ्लॉवर पैकी असतील त्या) परतते आणि त्यांना किनवा बरोबरच शिजू देते. छान होतो पुलाव.
I think this grain doesn't have much of a taste on its own. So it tastes like whatever seasoning you put on it while cooking. Leaves room for a lot of innovation,I guess :) (Although I prefer to stick to this basic, readymade recipe owing to laziness and lack of creativity! :P )
And I don't think this might be having an Indian name because it is originally from South America (Jay Google!). I am unaware of whether it's available in India or not, though.
It just occured to me, हे धान्य भातासारखं नुसतं शिजवून आमटी/फोडणीच्या वरणाबरोबर चांगलं लागेल का? ट्राय करायला हवं...
Post a Comment
Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.